Breaking News

क्रिकेट स्पर्धेत निजामपूर संघ विजेता

माणगाव ः प्रतिनिधी

येथील मंगु स्टार क्रिकेट क्लब आयोजित क्रिकेट स्पर्धेत राहीला इलेव्हन निजामपूर संघाने अंतिम सामन्यात आय्यान इलेव्हन माणगाव संघाचा दारुण पराभव करीत वाकडाई चषक पटकाविला. या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील 32 संघानी सहभाग घेतला होता. अंतिम सामन्यात राहीला इलेव्हन संघाचा फलंदाज अक्षय म्हात्रे याने शतकी खेळी केली. त्याने केवळ 22 चेंडूंत नाबाद 106 धावा फटकाविल्या. यात 15 षटकार व दोन चौकारांचा समावेश होता. तृतीय क्रमांक साई संघाने, तर चतुर्थ न्हावे संघाने मिळविला. स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज म्हणून खालिद बंदरकर, उत्कृष्ट गोलंदाज तेजस मोहिते, मालिकावीर म्हणून अक्षय म्हात्रे याची निवड करण्यात आली. विजेते संघ आणि वैयक्तिक उल्लेखनीय कामगिरी बजावणार्‍या खेळाडूंना बक्षीस देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेच्या उदघाटन व बक्षीस वितरण कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते संतोष खडतर, माणगावचे माजी उपसरपंच नितीन दसवते, भाजप युवा मोर्चाचे चिन्मय मोने, पोलीस रोशन जाधव, एकता क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष राहुल दसवते, गणेश जोरकर, प्रवीण शिंदे, अनिल जाधव, दीपेश जाधव, अविनाश पाटील आदी उपस्थित होते.

Check Also

वायू-जलप्रदूषण रोखण्यासाठी राज्यस्तरीय समिती; आमदार प्रशांत ठाकूर यांचा समावेश

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्यातील वायू व जलप्रदूषणाला आळा घालण्यासाठी तसेच औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांकडून घेतली जाणारी …

Leave a Reply