Breaking News

पनवेलच्या जोशी आळीतील मारुती मंदिर नव्या रूपात

नगरसेवक राजू सोनी यांचा पुढाकार

पनवेल : वार्ताहर

पनवेल शहरातील जोशी आळीतील आणि आताच्या सराफा बाजारातील शेकडो वर्षांपूर्वींचे असलेले मारुती मंदिर प्रसिद्ध नगरसेवक राजू सोनी यांच्या पुढाकाराने नव्या रूपात बांधण्यात आले आहे.

हरी लक्ष्मण जोशी यांच्या मालकीच्या असलेल्या या मारुती मंदिरात उत्तराभिमुखी वरद मारुतीची मूर्ती मंदिरामध्ये आहे. जोशी यांच्या पूर्वजांनी हे मंदिर बांधले आहे. हे मंदिर नव्याने बांधावे म्हणून नगरसेवक राजू सोनी यांनी जोशी यांच्याकडे परवानगी मागितली. परवानगी मिळाल्यानंतर नगरसेवक सोनी यांनी या मंदिराचे काम करवून घेतले. भक्तांचे श्रद्धास्थान असलेले हे मारुती मंदिर नव्या रुपात तयार झाल्याने भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

खूप दिवसांपासून माझी इच्छा होती की हे मंदिर नव्याने बांधावे. त्याप्रमाणे आज हे मंदिर बांधले आहे. पनवेल आणि परिसरातील अनेक भक्त या मारुती मंदिरात येतात. माझ्या हातून मंदिर नव्या रुपाने बांधले असल्याने मला आनंद आहे, असे नगरसेवक राजू सोनी यांनी सांगितले.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply