Breaking News

मद्याची अवैध वाहतूक करणारे जेरबंद

पेणजवळ ट्रकसह 82 लाखांचा मुद्देमाल जप्त

अलिबाग ः प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबई पथकाने गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची अवैध वाहतूक करणार्‍या त्रिकुटाला अटक केली आहे. त्यांच्याकडून ट्रकसह 82 लाख 62 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गोवा राज्यातून मुंबईकडे टाटा कंपनीच्या ट्रकमधून (एमएच 06-एक्यू 5846) बनावट विदेशी मद्याची अवैध वाहतूक होणार असल्याची खबर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबई भरारी पथकाला मिळाली होती.

त्यानुसार 13 ऑक्टोबरच्या मध्यरात्री मुंबई-गोवा महामार्गावरील पेण तालुक्यातील गड येथील ग्रीन पार्क फॅमिली रेस्टॉरंटसमोर सापळा रचण्यात आला. खबर्‍याने दिलेल्या माहितीनुसार ट्रक आला असता, पथकाने ट्रक अडवून तपासणी केली. या ट्रकमध्ये 180 मिलीच्या रॉयल ब्ल्यू व्हिस्कीच्या 48 बाटल्यांनी भरलेले 380 बॉक्स, 180 मिलीच्या गोवा व्हिस्कीच्या 48 बाटल्यांनी भरलेले 620 बॉक्स, तीन मोबाइल, तर दारू लपविण्यासाठी सिमेंटचे तुकडे, ताडपत्री आणि ट्रकसह 82 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणी मोहम्मद असिफ (23), क्लिनर पवन कुमार माहतो (21), जयेश भावसार (25) अशा तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांची उत्पादन शुल्क विभागाकडून चौकशी सुरू आहे.

राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमप यांच्या आदेशानुसार कोकण उपायुक्त सुनील चव्हाण, संचालक उषा वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संताजी लाड, मनोज चव्हाण, अशोक तारू, पी. एस. काळे, अमोल चिलगर, धनाजी दळवी, सुभाष रणखां, अविनाश जाधव, प्रवीण धवणे या पथकाने ही कारवाई केली.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply