पनवेल : रामप्रहर वृत्त
चिपळाई क्रिकेट क्लबतर्फे कै. नामदेव दिनकर पाटील यांच्या स्मरणार्थ आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन पनवेल तालुक्यातील बोनशेत येथील आझाद मैदानावर रविवारी (दि. 20) करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन भाजप पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाले. या वेळी भाजप पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, युवा मोर्चा तालुका सरचिटणीस विश्वजीत पाटील, चिपळ्याचे माजी उपसरपंच धनंजय पाटील आदी उपस्थित होते. दरम्यान, भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी या स्पर्धेला भेट दिली. या वेळी त्यांचे आयोजकांच्या वतीने युवा नेते विश्वजीत पाटील यांनी स्वागत केले. जि. प. सदस्य अमित जाधव, सुकापूर भाजप अध्यक्ष राजेश पाटील, युवा नेते हॅप्पी सिंग, हर्षवर्धन पाटील उपस्थित होते.