Breaking News

बामणडोंगरी संघाने जिंकला मानाचा आमदार चषक; लोकनेेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते पारितोषिक वितरण

पनवेल : रामप्रहर वृत्त

श्री गणेश न्हावेखाडी यांच्या वतीने आमदार चषक पनवेल-उरण 2022 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जयेश गोल्ड टीम बामणडोंगरी यांनी विजेतेपद पटकाविले. विजेत्यांना माजी खासदार लोकनेेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी (दि. 20) पारितोषिक वितरण करण्यात आले. पारितोषिक वितरण समारंभास न्हावा ग्रामपंचायतीचे सदस्य सागरशेठ ठाकूर, माजी सदस्य अरुणशेठ ठाकूर, प्रकाश कडू, न्हावेखाडी अध्यक्ष गोपीचंद ठाकूर, मधला पाडा अध्यक्ष नरेश मोकल, गव्हाणचे उपसरपंच विजय घरत, युवा कार्यकर्ता स्वप्नील ठाकूर, सदाशिव ठाकूर, अमर म्हात्रे, नील ठाकूर उपस्थित होते. या स्पर्धेत न्हावा येथील नटराज संघ उपविजेता ठरला. विजेत्या व उपविजेत्या संघांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply