Breaking News

रोडपालीचे युवक शिवसेनेत

पनवेल : रामप्रहर वृत्त : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा झंझावात सर्वत्र पसरत असून, रोडपालीतील तरुणांनी शिवसेनेेत सोमवारी (दि.25 )जाहीर प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून रोडपाली विभागामधील शेकडो युवकांनी शिवसेनेचा भगवा ध्वज हाती घेतला.

सर्व तरुणांचे रायगड जिल्हा समन्वयक अनिल चव्हाण, खासदार श्रीरंग बारणे, आमदार मनोहर भोईर, रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत, जिल्हा सल्लागार बबन पाटील यांनी स्वागत केले. या वेळी पनवेल महानगरप्रमुख रामदास शेवाळे, खारघर उपमहानगरप्रमुख दीपक घरत, खारघर शहरप्रमुख शंकरशेठ ठाकूर, कामोठा खांदा उपमहानगरप्रमुख राकेश गोवारी, कळंबोली, तळोजा उपमहानगरप्रमुख कैलास पाटील, पनवेल विधानसभा कार्यालय प्रमुख नितीन परब आदी उपस्थित होते.

Check Also

परेश ठाकूर यांची महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड

पनवेलसह रायगडच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानाची बाब पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनची (एमबीए) ८४वी चतुर्वार्षिक …

Leave a Reply