Breaking News

मयूर शेळके शिव पुरस्काराने सन्मानित

कर्जत : बातमीदार

तालुक्यातील चांधई ग्रामस्थ आणि हुतात्मा हिराजी पाटील तरुण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी लहान चांधई येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी  करण्यात आली. त्यावेळी शूरवीर मयूर शेळके यांना शिव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. इतिहास संशोधक शिवश्री वसंत कोळंबे यांच्या मार्गदर्शनाखाली लहान चांधई येथे गेल्या 16 वर्षापासून शिवजयंती साजरी करण्यात येत आहे. मध्य रेल्वेच्या वांगणी स्टेशन येथे एका अंधमातेच्या मुलाला ट्रेन खाली येत असताना कर्तव्यावर असलेले  मयूर शेळके यांनी मोठ्या धाडसाने वाचविले होते. त्यांना चांधई येथील शिवजयंती सोहळ्यात शिव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. धनंजय थोरवे, नेहा राजेंद्र आढाव, श्रावणी जाधव, सोनाली कोंडिलकर तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा या वेळी सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. पत्रकार बाळा गुरव यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. प्रा. विजय कोंडिलकर यांचे यावेळी व्याख्यान झाले. जि.प. सदस्या सहारा कोळंबे, नसरापूर सरपंच साक्षी मोहिते, माजी सरपंच राम कोळंबे, चांधई गावचे पोलीस पाटील सचिन कोळंबे, पळस्पे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मोहन गवंडी, तसेच जयेंद्र कराळे, विनायक पारधी, संतोष ऐनकर, भगवान धुळे, आकाश निर्मळ यांच्यासह ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते.

Check Also

पनवेल महापालिकेच्या विविध विकासकामांचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका महाराष्ट्र राज्य, देश अशा सर्व स्तरावर पुढे जाण्यासाठी आगेकूच …

Leave a Reply