Breaking News

कोकण मर्कंटाईल बँकेच्या पनवेल शाखेचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त
कोकण मर्कंटाईल बँकेच्या पनवेल शाखेचे उद्घाटन भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी (दि. 21) करण्यात आले. शहरातील कच्छी मोहल्ल्यात महात्मा गांधी मार्गावर ही बँक शाखा सुरू झाली असून तेथे ग्राहकांना एटीएमचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या कार्यक्रमास नगरसेवक मुकीद काझी, बँकेचे उपाध्यक्ष असिफ दादन, विभागीय संचालक समद अधिकारी, अजगर दबेर, रायगड विभाग अध्यक्ष मुस्तफा पोंजेकर, कोकणी डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष वसीम फोफलनकर, पनवेल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष इक्बाल काझी, अध्यक्ष शाम्स एज्युकेशनचे अध्यक्ष अशफाक खामकर, बँकचे सहसंचालक खलील दाबेर, नदीम दादन, रमिझ मुल्ला, जाहिद पटेल, नाविद पटेल, रामजी मुल्ला, अतिक खोत, अस्लम मुन्शी, नझीम नालखांडे, अ‍ॅड. कडव, अ‍ॅड. यशवंत भोपी, अहमद फकीह, अ‍ॅड. परवेझ खान, तलाल मुल्ला आदी उपस्थित होते. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी बँकेच्या पदाधिकार्‍यांना या 25व्या शाखेनिमित्त शुभेच्छा दिल्या.

कोकण मर्कंटाईल बँकेच्या माध्यमातून ग्राहकांना जलद गतीने व्यवहार होण्याच्या दृष्टिकोनातून उपायोजना करण्यात येत आहे. या बँकेच्या माध्यमातून देण्यात येणार्‍या सुविधांमुळे ही बँक अल्पसंख्याक समाजाच्या 50 बँकांपैकी एक सर्वोत्कृष्ट बँक बनली आहे.
-आमदार प्रशांत ठाकूर, भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष

Check Also

कॉमनवेल्थ सुवर्णपदक विजेती स्वस्तिका घोषचा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार

पनवेल : रामप्रहर वृत्तकॉमनवेल्थ स्पर्धेतील टेबल टेनिस चॅम्पियनशिप २०२६मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत पनवेलच्या स्वस्तिका …

Leave a Reply