Breaking News

उल्हास नदीतील गाळ काढा; निर्मल जल अभियान कार्यकर्त्यांची मागणी

कर्जत : बातमीदार

बारा महिने वाहणार्‍या कर्जतमधील उल्हास नदीला कचरा, गाळ यामुळे विद्रुप स्वरूप आले आहे.  नदीतील गाळ काढण्याची मागणी उल्हास नदी निर्मल जल अभियानाच्या कार्यकर्त्यांनी कर्जतचे तहसीलदार विक्रम देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. गेल्या वर्षी उल्हास नदीला आलेल्या पुराचे पाणी कर्जत शहरात घुसले होते. त्यामुळे शहरातील कोतवाल नगर, मुद्रे, रेव्हेन्यू वसाहत, अभिनव ज्ञान मंदिर शाळेचा परिसर, आमराई, आणि इतर भागात राहणार्‍या नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. तर  अनेक जण बचावले होते. श्रीराम पुल परिसरातील उल्हास नदीपात्राकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. यासाठी बर्‍याच वर्षांपासून साचलेला गाळ आणि जमा झालेला कचरा आणि तेथे वाढत असलेल्या झुडुपांनी धरून ठेवलेल्या मातीमुळे नदीपात्राची पातळी उथळ झाली आहे. नदीपात्रात ठिकठिकाणी झालेल्या बेकायदेशीर बांधकामांमुळे पुढील पावसाळ्यांमध्ये अशीच पूर परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. संभाव्य धोका टाळण्यासाठी नदीपात्रात असलेला गाळ, वाढलेली झुडूपे काढून नदीच्या पाण्याचा नैसर्गिक प्रवाह पूर्ववत करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. उल्हास नदी निर्मल जल अभियानाचे कार्यकर्ते समित सोहनी यांनी हे निवेदन तहसीलदार विक्रम देशमुख यांना दिले.

उल्हास नदी निर्मल जल अभियान यांनी केलेल्या  आवाहनाला प्रतिसाद देऊन मागील आठवड्यात शनी मंदिर येथे कर्जतमधील 15 नागरिकांनी नदीतील गाळ काढण्यासाठी श्रमदान केले.

-विकास चित्ते, कार्यकर्ता, उल्हास नदी निर्मल जल अभियान

Check Also

उत्तर रायगड भाजपमध्ये संघटनात्मक नियुक्त्यांची घोषणा

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष उत्तर रायगड जिल्ह्यांतर्गत मंडळ, विविध मोर्चे, आघाडी आणि सेलच्या …

Leave a Reply