Breaking News

श्रेयस अय्यरची तुफान फटकेबाजी

मुंबई : प्रतिनिधी

मुंबईकर श्रेयस अय्यरने ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये भीमकाय पराक्रम केला. त्याने सय्यद मुश्ताक टी-20 क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी (दि. 21) अफलातून खेळी साकारताना रिषभ पंत, सुरेश रैना आणि वीरेंद्र सेहवाग यांना मागे टाकले. त्याने सिक्कीम संघाविरुद्धच्या सामन्यात 55 चेंडूंत 147 धावा चोपून काढल्या.

टी-20 क्रिकेटमध्ये सर्वोत्तम वैयक्तिक खेळी करण्याचा विक्रम श्रेयसने आपल्या नावावर नोंदवला. याशिवाय त्याने अनेक विक्रमांना गवसणी घातली. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा चोपणार्‍या भारतीय संघात मुंबईने दुसरे स्थान पटकावले. या विक्रमात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू 263 धावांसह आघाडीवर आहे. बंगळुरूनं 2013 मध्ये वॉरियर्सविरुद्ध 5 बाद 263 धावा चोपल्या होत्या.

Check Also

अखिल भारतीय टेबल टेनिस स्पर्धेत स्वस्तिका घोष विजेती

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन पनवेल : रामप्रहर वृत्त अखिल भारतीय आंतर संस्थात्मक टेबल टेनिस …

Leave a Reply