Breaking News

पत्रकारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण; आरोपीला अटक, पोलीस अधीक्षकांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे

अलिबाग : प्रतिनिधी

नेरळ येथील पत्रकार अजय गायकवाड यांच्यावर  हल्ला करणार्‍याला तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी रायगड प्रेस क्लबच्या वतीने सोमवारी (दि. 21) अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षणिक उपोषण करण्यात आले. पत्रकारांच्या शिष्टमंडळाने रायगडचे पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांची भेट घेतली. आरोपीला ताब्यात घेतले आहे, त्याला न्यायालयात हजर केले जाईल. न्यायालयाच्या आदेशानुसार आरोपीवर कारवाई केली जाईल. असे आश्वासन अशोक दुधे यांनी दिले. त्यानंतर पत्रकारांनी उपोषण मागे घेतले. बातमी देण्याच्या रागातून नेरळ वाल्मिकीनगर येथील तरुणाने 15 फेब्रुवारी रोजी पत्रकार अजय गायकवाड (रा. नेरळ) यांना मारहाण केली होती. या गुन्ह्याची नोंद नेरळ पोलीस ठाण्यात त्यादिवशी करण्यात आली होती, मात्र आरोपीला अटक झाली नव्हती. पोलिसांनी आरोपीला तत्काळ अटक करावी, या मागणीसाठी रायगड प्रेस क्लबच्या वतीने अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे लक्षणिक उपोषण करण्यात आले होते. रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष भारत रांजणकर, उपाध्यक्ष मोहन जाधव, कार्याध्यक्ष मनोज खांबे, माजी अध्यक्ष  विजय मोकल, अनिल भोळे, संतोष पेरणे, अभय आपटे, दर्वेश पालकर, अजय गायकवाड, रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नागेश कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार बळवंत वालेकर, ज्येष्ठ छायाचित्रकार वामन पाटील आदी या आंदोलनात सहभागी झाले होते.

नेरळमधील पत्रकार अजय गायकवाड यांच्यावर 15 फेब्रुवारी रोजी हल्ला करण्यार्‍या आरोपीला ताब्यात घेतले आहे, कर्जत न्यायालयाच्या आदेशानुसार आरोपीवर कारवाई केली जाईल.

-अशोक दुधे, पोलीस अधीक्षक, रायगड

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply