Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते ‘आदिवासी दिनदर्शिका’चे प्रकाशन

पनवेल : रामप्रहर वृत्त

आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र राज्यच्या 2021च्या आदिवासी दिनदर्शिकाचे प्रकाशन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. 27) करण्यात आले. आदिवासी समाजातील गोरगरीब कुटूंबांना अल्पदरात दिनदर्शिका उपलब्ध करून देण्यासाठी आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र राज्याच्या वतीने दरवर्षी आदिवासी दिनदर्शिका प्रकाशित करण्यात येते. या दिनदर्शिकेमध्ये समाजातील क्रांतिकारक, सन- उत्सव, अन्य माहितींचा उल्लेख व नोंद केल्या जात असतात. या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले की, गणपत वारगडा हे समाजातील वृत्तपत्र आदिवासी सम्राटचे संपादक आहेत. त्यांनी आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र राज्य संघटनेची स्थापना करून समाजातील अनेक लोकांना न्याय देण्याचे काम करत असतात. गणपत वारगडा हे 20 व्या वर्षापासून समाजाचे काम करत आहेत. आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र राज्याच्या संघटनेच्या शाखा रायगड जिल्हा, पुणे जिल्हा, नवी मुंबई जिल्हा तर आता ठाणे जिल्ह्यात सुध्दा त्यांच्या संघटनेच्या शाखा आहेत. त्यामुळे आदिवासी दिनदर्शिका ही समाजामध्ये सर्वत्र पोहचण्यास सोयीस्कर होत असते. त्यामुळे पत्रकार गणपत वारगडा यांना समाजात मोलाचे स्थान आहे. या वेळी ज्येष्ठ पत्रकार, दैनिक वादळवाराचे संपादक विजय कडू,  प्रेस क्लब पनवेलचे अध्यक्ष अकबर सय्यद, पनवेल तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष रत्नाकर पाटील, दैनिक रायगड नगरीचे अरविंद पोतदार, आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र सचिव सुनिल वारगडा, आदिवासी सेवा संघ, रायगड जिल्हाध्यक्ष बुधाजी हिंदोळे, रायगड जिल्हा सचिव गणेश पारधी, पत्रकार राज भंडारी, पञकार रवी गायकवाड, पत्रकार साहिल रेळेकर, पत्रकार सनीप कलोते, पत्रकार विशाल सावंत आदी उपस्थित होते.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply