Breaking News

अमिना इलेव्हन आयपीपीएलचा मानकरी

पनवेल : रामप्रहर वृत्त
आयपीपीएल क्रिकेट स्पर्धेत अमिना इलेव्हन या संघाने विजेतेपद पटकाविले आहे. इंटर पनवेल क्रिकेट कमिटी आणि ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या वतीने शहरातील मिडलक्लास हौसिंग सोसायटीच्या मैदानावर इंटर पनवेल प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेचे बक्षीस वितरण सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. 20) झाले.
दोन दिवसीय आयपीपीएलमध्ये पनवेलमधील आठ संघांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेतील सामने रंगतदार झाले. दर्शकांनी उपस्थित राहून रोमहर्षक लढतींचा आनंद घेतला. या स्पर्धेत युनायटेड इलेव्हन संघ उपविजेता ठरला. सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून वसीम पटेल आणि मालिकावीर म्हणून अश्विनी कोट्याल यांची निवड करण्यात आली. विजेते संघ आणि चमकदार कामगिरी करणारे खेळाडू यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
बक्षीस वितरण समारंभ नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, अजय बहिरा, मुकीद काझी, उद्योजक राजू गुप्ते, उल्लास झुंझारराव, प्रशांत झुंझारराव, इंटर पनवेल क्रिकेट कमिटीचे अध्यक्ष सुमित झुंझारराव यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, खेळाडू आणि क्रिकेटप्रेमी उपस्थित होते.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply