आयपीएलची नवी मुंबईत जोरदार तयारी

नवी मुंबई ः बातमीदार

इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलचे 20 सामने 27 मार्च ते 18 मे या कालावधीत नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये खेळविण्यात येणार आहेत. या निमित्ताने जगभरातील नामांकित क्रिकेटपटू व क्रीडारसिक नवी मुंबई शहरामध्ये येणार आहेत. त्यामुळे यजमान शहर म्हणून नवी मुंबईचा आधुनिक शहर म्हणून असलेला नावलौकिक प्रदर्शित व्हावा यादृष्टीने महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी आयपीएलच्या अनुषंगाने करावयाच्या कामांचे नियोजन करण्यासाठी क्रीडा विभाग व संबंधित विभागांची आढावा बैठक घेतली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त संजय काकडे, शहर अभियंता  संजय देसाई, क्रीडा विभागाचे उपायुक्त  मनोजकुमार महाले, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, उद्यान विभागाचे उपायुक्त जयदीप पवार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पाटील, परिवहन व्यवस्थापक  योगेश कडुसकर, अतिरिक्त शहर अभियंता शिरीष आरदवाड व इतर अधिकारी उपस्थित होते. नवी मुंबईत होणार्‍या आयपीएलच्या 20 सामन्यांपैकी 16 सामने हे प्रकाशझोतात खेळविले जाणार आहेत. त्या अनुषंगाने प्रामुख्याने वाहन पार्किंग व्यवस्थेकडे पोलीस विभागाच्या सहकार्याने विशेष लक्ष देण्याचे आयुक्तांनी सूचित केले. स्टेडियमच्या एकूण क्षमतेच्या 25 टक्के प्रेक्षकांना प्रत्यक्ष स्टेडियमध्ये बसून हे सामने पाहता येणार असल्याने किमान पाच हजार गाड्यांच्या पार्कींगचे नियोजन करावे असे निर्देश आयुक्तांनी दिले. पार्किंग क्षेत्राच्या जवळ प्रसाधनगृहांची व्यवस्था करण्याच्याही सूचना आयुक्तांनी  दिल्या. पार्किंगच्या ठिकाणी सुयोग्य विद्युत व्यवस्था राहील याची दक्षता घ्यावी आणि परिसर सामने झाल्यानंतर त्वरित पूर्ण स्वच्छ होईल याकडेही काटेकोर लक्ष देण्याचे निर्देशित करण्यात आले. पार्किर्ंंगच्या निश्चित करण्यात आलेल्या जागांची माहिती सामने पाहण्यासाठी येणार्‍या क्रीडा रसिकांना उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने विविध माध्यमांतून व्यापक प्रसिद्धी करावी, असेही आयुक्तांनी म्हटले. या संपूर्ण व्यवस्थेसाठी आयपीएल आयोजक समुहाकडून समन्वयक नियुक्त करण्याबाबत संबंधितांना सूचित करण्यात यावे असे, सांगून गर्दीचे नियोजन करण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना कराव्यात तसेच आरोग्य व अग्निशमन या दोन्ही यंत्रणांनी सुसज्ज रहावे, असे आयुक्तांनी आदेशित केले.

स्वच्छ व सुंदर शहर हा नवी मुंबईचा नावलौकिक असून नुकत्याच झालेल्या आशियाई महिला फुटबॉल चषक आंतरराष्ट्रीय स्पर्धेनंतर लगेचच आयपीएलचे सामने नवी मुंबईत होत असून हा शहरासाठी सन्मान आहे. जागतिक किर्तीचे खेळाडू व दर्शकांचे स्वागत करताना त्यांच्या नजरेत शहराची प्रतिमा उंचावेल अशा प्रकारे नियोजन करण्याकडे काटेकोर लक्ष द्यावे.

-अभिजीत बांगर, आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका

Check Also

The member group is always indeed there to aid when needed

Partypoker are an extremely valued spouse for people. And greatest of all – the value …

Leave a Reply