भाजपच्या शर्मिला सत्वेंची सामाजिक बांधिलकी
माणगाव : प्रतिनिधी
भाजप महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा शर्मिला सत्वे यांच्या प्रयत्नाने माणगाव तालुक्यातील ज्योती महादेव खाडे (रा. बामणोली), सावित्री रोंगु काटकर (रा. खांदाड) पार्वती चंदर हिलम या विधवा महिलांना संजय गांधी निराधार अनुदान योजनेतून प्रत्येकी 20 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य मिळाले आहे. या महिलांना जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते नुकताच अर्थ सहाय्याच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले.
सप्तसुत्री कार्यक्रमा अंतर्गत माणगाव तहसील कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला प्रांताधिकारी प्रशाली जाधव दिघावकर, तहसीलदार प्रियांका कांबळे, म्हसळा प्रांताधिकारी अमित शेडगे, तळा तहसीलदार ए. एम. कनशेट्टी, घरेलू कामगार संघटनेचे सदस्य देवका मोरे (निलज), मीना सकपाळ (बामणोली), दीप्ती खराडे (रुद्रवली), नीलिमा खाडे (माणगाव), अरुणा वाघमारे (निलज), बाबुराव चव्हाण (पोटणेर), उदय गुरव (निजामपूर), रमेश शिंदे (निलज) आदी उपस्थित होतेे. गरीब विधवा महिलांना अर्थसहाय्य मिळवून दिल्याने शर्मिला सत्वे यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.
कोरोना काळात काम करणार्या घरेलू महिला कामगारांना शासनातर्फे प्रत्येकी 1500 रुपये तसेच 100 जणांना श्रमकार्ड मिळवून दिले. याचबरोबर अनेकांना आधारकार्ड, बँक पासबुक काढून दिले असल्याचे शर्मिला सत्वे यांनी सांगितले.