Breaking News

पनवेल येथे रविवारी जाहीर पक्षप्रवेश, कार्यकर्ता मेळावा

पनवेल ः रामप्रहर वृत्त

पनवेल तालुक्यातील आणि उरण विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या दापोली येथील शेतकरी कामगार पक्षाचे माजी उपसरपंच गजानन तुळशीराम पाटील व त्यांचे शेकडो सहकार्‍यांचा भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश आणि कार्यकर्ता मेळावा रविवारी (दि. 13) सकाळी 10 वाजता खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयाच्या सभागृहात होणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Check Also

नवी मुंबई विमानतळाला ‌‘दिबां‌’चे नाव द्या; भाजपचे लक्षवेधी आंदोलन

पनवेल : रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्व. दि.बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी …

Leave a Reply