Breaking News

पारधी समाजासाठी नवीन आधारकार्ड नोंदणी सुरू

भाजपच्या विद्या तामखडे यांचे प्रयत्न

कामोठे : रामप्रहर वृत्त

कामोठे परिसरातील पारधी समाजासाठी नवीन आधारकार्ड नोंदणी सुरुवात करण्यात आली आहे. या कामी भाजप भटके विमुक्त महिला आघाडीच्या उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष विद्या तामखडे यांनी प्रयत्न केले आहे.

मागच्या पंधरवड्यात विद्या तामखडे यांनी पारधी समाजाच्या पालावर जाऊन त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना कायमचा कामोठे शहरात आधार देण्याचा व आपला मतदार करण्याचा निर्धार केला. त्यानुसार त्यांच्या अडचणी समजून घेताना त्यांना आधार आणि रेशन कार्ड नसल्याने अडचणी होत असल्याचे समजल्यावर आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पारधी समाजासाठी नवीन आधारकार्ड नोंदणी सुरुवात करण्यात आली.

या वेळी विद्या तामखडे यांच्यासोबत सामाजिक कार्यकर्ते सागर पाटील आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply