नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जगभरात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. चीन, दक्षिण कोरीया, अमेरीका, ब्रिटन, इटलीसारख्या देशात मोठ्या वेगाने कोरोनाचा फैलाव पुन्हा होताना दिसत आहे. जगातील विविध ठिकाणी वेगवेगळ्या कोरोनाच्या व्हेरीयंटमुळे मोठी रुग्णवाढ होत आहे. जगभरात सध्या परिस्थिती बदलत आहे कोरोनाची चौथी लाट अनेक देशात आली असल्याचे चित्रही पाहायला मिळत आहे.
चीनमधील वुहान शहरात कोरोना विषाणू सर्वांत पहिल्यांदा आढळल्यानंतर जगभराला कोरोनाच्या भयंकर लाटेचा सामना करायला लागला. आता पुन्हा चीनच्या काही भागात कोरोना पुन्हा वाढत आहे. चीनच्या जिलिन प्रांतात राष्ट्रीय आरोग्य आयोगानुसार पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याचे पाहायला मिळाले. काही बाधितांचा मृत्यूही झाला. त्यामुळे दोन कोटी संख्येच्या संपूर्ण जिलिनप्रांतात कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे. दरम्यान, चीनमध्ये ज्याप्रकारे कोरोनाची रुग्णवाढ होतेय. त्याचप्रकारे दक्षिण कोरीयातदेखील होताना दिसत आहे. दक्षिण कोरीयात एका दिवसातील सर्वाधिक रुग्णवाढ बघायला मिळाली. ज्यात सहा लाख 21 हजार रुग्णसंख्या होती. जी दक्षिण कोरीयाच्या एकूण लोकसंख्येच्या 1.2 टक्के इतकी आहे. दुसरीकडे, अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, रशियासारख्या देशात मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्येत वाढ होते आहे.
जगभरात हा ओमायक्रॉनचा सब-व्हेरीयंट वेगाने पसरतोय. अशात अनेक देशांतून यावर नॉन-टॉलरन्स स्टॅटर्जी वापरतलॉकडाऊनसारखे कठोर निर्णयदेखील घेतले जातायत. त्यामुळे पुन्हा एकदा त्या-त्या देशातील अर्थव्यवस्था कासवगतीने पुढे जातानाबघायला मिळत आहे. जगभरात बीए1 आणि बीए2 चा होणारा फैलाव अधिक तीव्र झाला आहे. अशात ह्या नव्या व्हेरीयंटची वेगळी लक्षणे अद्यापहीसमोर आलेली नाही आहेत. मात्र, होणारे मृत्यूदेखील चिंतेचा विषय आहे. अशात लसीकरण, आणि कोविड नियमांच्या पालना पुढे काहीही पर्याय नसल्याचेदेखील दिसत आहे. अशात आलेला नवा व्हेरीयंट जगावर कसा आघात करतो आणि किती हानी करतो, हे बघणे महत्त्वाचे असेल.
भारतामध्ये गेल्या दोन वर्षांपासून मर्यादित असणार्या आंतरराष्ट्रीय उड्डाण सेवा पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहेत. केंद्रीय हवाई मंत्रालयाने येत्या 27 मार्चपासून आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सेवा पूर्ण क्षमतेन सुरू होणार असल्याचे सांगितल आहे, पण आता जगभरात वाढणार्या रुग्णांमुळे ही विमानसेवा पूर्ण क्षमतेने सुरू होणार का? हे पाहावे लागेल.
अशी आहे रुग्णवाढ
दक्षिण कोरीयात मागील 24 तासांत चार लाख रुग्णसंख्या आढळली आहे. ब्रिटनमध्ये एका दिवसात 90 हजार नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद होत मागील आठवड्यापेक्षा 24 टक्क्यांनी रुग्णसंख्या वाढली. ऑस्ट्रियात रुग्णसंख्या वाढत असल्याने मास्क घालणे बंधनकारक समोआ देशात कम्युनिटी स्प्रेड झाल्याने संपूर्ण टाळेबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. अमेरीकेत मागील 24 तासांत 35 हजार 597 कोरोना रुग्ण आढळेत. चीनमध्ये मागील 24 तासांत 3 हजार 844 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.