कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्यातील बोपेले कोल्हारे येथे स्त्रीशिक्षणाच्या आद्य पुरस्कर्त्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून व्यायामशाळेचे उद्घाटन करण्यात आले. नेरळ-पिंपळोली रस्त्यावर बोपेले येथील बुद्धविहारात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शासनाच्या दलित विकास योजनेंतर्गत निधीतून ही व्यायामशाळा उभारण्यात आली असून ती बोपेले गावातील तरुणांसाठी नक्कीच लाभदायक ठरेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. श्रीमती कांताई मधुकर मोरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ व्यायामशाळेला कांताई व्यायामशाळा असे नाव देण्यात आले आहे.
Check Also
रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव
आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …