पणजी : वृत्तसंस्था
गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा प्रमोद सावंत यांची नियुक्ती करण्यात आलीय. भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत हा प्रमोद सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा प्रमोद सावंत यांची नियुक्ती करण्यात आलीय. भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत हा प्रमोद सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. मुख्यमंत्री निवडीसाठी पर्यवेक्षक म्हणून आलेले भाजप नेते नरेंद्र सिंह तोमर यांनी प्रमोद सावंत यांच्या नावाची घोषणा केली. त्यावेळी भाजपचे गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते उपस्थित होते.
भाजपने ताळगाव येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर शपथविधीची तयारी सुरू केली असून हा सोहळा तितकाच दिमाखदार पद्धतीने करण्याचा भाजपचा प्रयत्न असून यासाठी केंद्रातील वरिष्ठ नेते सहभागी होण्याची शक्यता आहे.
Check Also
गव्हाण ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा
उलवे नोड : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित ग्रामसभा शुक्रवारी (दि.१) माजी …
RamPrahar – The Panvel Daily Paper