पनवेल ः रामप्रहर वृत्त
रिटघर येशील भैरवदेव विद्यालय व लोकनेते रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात बुधवारी (दि. 11) विज्ञान प्रदर्शन, विदयार्थीनी समुपदेशन व एनएसएस कॅम्पचे पथनाट्य सादरीकरण झाले.
विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका बी. एम. नाईक यांच्या हस्ते झाले. या प्रदर्शनात इयत्ता 5 वी ते 10 वी अखेरच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. तसेच प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी तयार केलेली उपकरणे व खेळणी सादर करण्यात आली होती. प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी
एम. बी. जाधव, एस. एस. पाटील आदींसह शिक्षक व विद्यार्थ्यांनी विशेष मेहनत घेतली.
तसेच विद्यार्थिनींसाठी वयात येताना या विषयावर आरती नाईक यांनी मार्गदर्शन केले. एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनावर पथनाटय सादर केले.