Breaking News

छावा फाउंडेशनतर्फे एचआयव्हीग्रस्त मुलांसाठी करिअर मार्गदर्शन

पनेवल ः रामप्रहर वृत्त

कामोठे येथील छावा फाउंडेशन ट्रस्टतर्फे एचआयव्हीग्रस्त मुलांसाठी रविवारी (दि. 20) अकुर्ली नवीन पनवेल येथे करिअर मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरासाठी विद्यार्थी सुनीलकुमार पंडा प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. मार्गदर्शन शिबिराचा 50 मुलांनी लाभ घेतला. सुनीलकुमार पंडा यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास जागवला. शिबिरादरम्यान मुलांना नाष्टा आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. चांगले भविष्य हे प्रत्येक लहान मुलाचा हक्क आहे आणि समाजातील वंचित मुलांसाठी प्रत्येकाने केलेल्या लहानशा योगदानाने खूप फरक पडू शकतो, असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष दामोदर बाजीराव चव्हाण यांनी केले. त्यांच्यासोबत विविध उपक्रमाच्या यशस्वितेसाठी संस्थेचे उपाध्यक्ष सचिन तांबोली, सचिव शेखर जगताप, खजिनदार सायली चव्हाण, सदस्य मीना यादव,  निलेश घारे, कविता दुराईराज, सौरिष दुराईराज, काजल अवताडे, सुशांत अवताडे, कैलाश कौशिक, दिनेश यादव, सोनाली कौशिक, संगीता यादव, सागर नरसाळे, आदित्य नरसाळे, प्रवीण डोंगरे यांनी विशेष मेहनत घेतली.

Check Also

पनवेल रेल्वेस्थानकात आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून पाहणी

पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल रेल्वेस्थानक परिसरात सध्या नवीन रेल्वे ट्रॅक, पार्किंग आणि प्लॅटफॉर्मवरील विविध कामे …

Leave a Reply