रोडपाली येथील रस्त्याच्या कामाला सुरुवात
पनवेल : रामप्रहर वृत्त
कळंबोलीतील रोडपाली येथे नगरसेवक अमर पाटील यांच्या पुढाकाराने रस्त्याच्या कामांना सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहेत.
फेब्रुवारी महिन्यात रोडपाली परिसरात गॅस पाइपलाइन टाकण्यासाठी ठिकठिकाणी रस्ता खोदून ठेवण्यात आला होता. पाइपलाइन टाकल्यानंतर रस्त्यांची डागडुजी करण्यात आली नव्हती. त्यामुळे याबाबत कळंबोली येथील भाजपचे नगरसेवक अमर पाटील यांनी यासंदर्भात सिडकोच्या कळंबोलीतील कार्यकारी अभियंता यांची भेट घेऊन रस्त्याची दुरूस्ती न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर नगरसेवक अमर पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून रोडपाली येथील रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
या कामाचे भूमिपूजन गुरुवारी (दि. 24) नगरसेवक अमर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. रस्त्याचे काम सुरू झाल्याने नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहेत.