मुंबई : प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून अकरावी प्रवेशासंदर्भात विद्यार्थी आणि पालक यांच्या मनात साशंकता असली तरी विद्यार्थ्यांचे नुकसान राज्य शासन होऊ देणार नाही, अशी ग्वाही शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली आहे.
अकरावी प्रवेश प्रक्रिया नियमित वेळापत्रकानुसारच सुरू करण्यात येत असून या प्रक्रियेला कोणताही विलंब झालेला नाही. अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या मुलांना प्रवेशात प्राधान्य मिळेल मात्र राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना प्रवेशात प्राधान्य मिळणार नाही, अशी अनाठायी भीती व्यक्त करण्यात येत असून अनेक पालक अकरावी प्रवेशासाठी आपल्याला भेटत असल्याचे तावडे यांनी सांगितले.