पोलादपूर : प्रतिनिधी
पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखर आयोजित क्रिकेट स्पर्धेत गावातीलच गणेश मालुसरे मित्र मंडळाने विजेतेपद पटकाविले. अनिकेत समर्थ महाड संघ उपविजेता ठरला.
स्पर्धेत मालिकावीर केतन म्हात्रे, उत्कृष्ट फलंदाज सुरज करकरे, उत्कृष्ट गोलंदाज जयदीप बोडीवले, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक राहुल कदम ठरले. असोसिएशन गटातून हळदुले संघ प्रथम आणि देवळे संघ द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरले.
या वेळी महाडच्या नगराध्यक्ष स्नेहल जगताप, जि. प.चे सदस्य चंद्रकांत कळंबे, पोलादपूरचे उपनगराध्यक्ष नागेश पवार, सभापती शैलेश सलागरे, भाजप नेते रमेश फोफेरकर, युवा नेते विकास गोगावले, असोसिएशनचे अध्यक्ष निलेश कोळसकर, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत जाधव, पत्रकार मिलिंद खारपाटील आदी उपस्थित होते. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संदीप कदम, स्वप्नील चोरगे, अध्यक्ष संजय चोरवे, उपाध्यक्ष नितेश मालुसरे आणि मंडळाच्या सर्व सदस्यांनी मेहनत घेतली.
Check Also
पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध
पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …