Breaking News

महात्मा ज्योतिबा फुले आश्रमशाळेच्या नूतन वास्तूचे उद्घाटन

रयतचे चेअरमन डॉ. अनिल पाटील व लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती

पनवेल ः रामप्रहर वृत्त

रयत शिक्षण संस्थेच्या मोखाडा येथील महात्मा ज्योतिबा फुले प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत जे. एम. फायनान्शियल फाउंडेशनच्या वतीने नूतन वास्तू आणि रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या कामांचे रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्याहस्ते उद्घाटन झाले. यावेळी मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर उपस्थित होते.

या वेळी डॉ. अनिल पाटील यांनी, आश्रमशाळेला सर्वतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही दिली. रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा ज्योतीबा फुले प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत जे. एम. फायनान्शियल फाउंडेशनच्या सीएसआर निधीमधून शालेय इमारतीचे नूतनीकरण, नवीन  स्वच्छतागृहे तसेच रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प उभरण्यात आला आहे. या नूतन वास्तूंचे रयतचे चेअरमन डॉ. अनिल पाटील आणि जे. एम. फायनान्शियल फाउंडेशनच्या विश्वस्त आणि चेअरमन दीप्ती निलकंतन यांच्या हस्ते झाले.

या कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव डॉ. विठ्ठल शिवणकर, व्हाईस चेअरमन भगीरथ शिंदे, माध्यमिक विभागाचे सह सचिव संजय नागपुरे, ऑडिटर डॉ. शिवलिंग मेनकुदळे, शहाजी डोंगरे, जे. एम. फाउंडेशनच्या सीएसआर प्रमुख पुजा दवे, विश्वस्त दीप्ती निलकंतन, नवी मुंबई महापालिकेचे माजी नगरसेवक दशरथ भगत, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी उपस्थित विद्यार्थ्यांना दप्तर वाटप ही करण्यात आले.

विद्यार्थ्यांना सोयाबिन दुधाचे वाटप

मोखाडा तालुक्यातील तेलीपाडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये सायटेक सोयामेट हे सोयाबीनपासून तयार करण्यात आलेले दूध विद्यार्थ्यांना रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील आणि मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply