उरण ः वार्ताहर
दिघोडे येथे रानसई धरणाकडे जाणार्या एका ट्रेलरने मंगळवारी (दि. 29) दुपारी अचानक पेट घेतला. जवळच असणार्या एका यार्डमधील अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ धाव घेत ट्रेलरला लागलेली आग विझविली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
दिघोडे येथील रानसई धरणाकडे जाणार्या रस्त्याच्या बाजूला असलेल्या आर्यन यार्डजवळ एमएच 43 वाय 1754 या ट्रेलरच्या मागील चाकांना अचानक आग लागली. ही आग उन्हामुळे तापलेला रस्ता व चाकांच्या घर्षणाने लागल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.