Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल ः रामप्रहर वृत्त

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, वैद्यकीय, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांत अविरतपणे उल्लेखनीय कार्य करणारे आणि सर्व समाजाला प्रेरणादायी असलेले माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांना रविवारी (दि. 7) दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
आंतरराष्ट्रीय एक्सलन्स अवॉर्ड पुरस्कार सोहळ्याचे आयोजन पनवेलमधील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात करण्यात आले होते. या वेळी पत्रकारिता तसेच इतर क्षेत्रांत आपल्या कार्याचा ठसा उमटविणार्‍या कर्तृत्ववान महिला व पुरुषांचा सन्मान करण्यात आला. या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांना खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून खासदार श्रीरंग बारणे, झी चोवीस तास न्यूज चॅनलचे संपादक निलेश खरे, दै. महाराष्ट्र जनमुद्राचे संपादक डॉ. दीपक दळवी, भारतीय पत्रकारचे संघाचे अध्यक्ष सुनील सोनवणे, पेण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अ‍ॅड. मंगेश नेने, अलबत्या गलबत्या या लोकप्रिय नाटकातील चिंची चेटकिणीची मध्यवर्ती भूमिका साकारणारे अभिनेते निलेश गोपनारायण, मिसेस इंडिया इंटरनॅशनल दुबई येथील विजेत्या डॉ. शुभदा जगदाळे यांची विशेष उपस्थिती होती. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. महेंद्र देशपांडे व सहकार्‍यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते.
सोहळ्यास लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सुविद्य पत्नी शकुंतला ठाकूर, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, ज्येष्ठ नेेते वाय.टी.देशमुख, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, महानगरप्रमुख प्रथमेश सोमण, माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, माजी उपमहापौर चारुशीला घरत, सीताताई पाटील, भाजप शहराध्यक्ष अनिल भगत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष अमित जाधव, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, महिला मोर्चा शहराध्यक्ष राजश्री वावेकर, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, माजी नगरसेवक प्रकाश बिनेदार, एकनाथ गायकवाड, अ‍ॅड. मनोज भुजबळ, अजय बहिरा, तेजस कांडपिळे, निलेश बावीस्कर, माजी नगरसेविका दर्शना भोईर, अ‍ॅड. वृषाली वाघमारे, कुसुम म्हात्रे, वर्षा ठाकूर, अर्चना ठाकूर, अमोघ ठाकूर, आदेश ठाकूर, अपूर्व ठाकूर, आदित्य ठाकूर, संजय भगत, अजय भगत, सरपंच आनंद ढवळे, प्रमोद भिंगारकर, माजी पं. स. सदस्य भूपेंद्र पाटील, निलेश पाटील, लोकनेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे पुत्र अतुल पाटील, संजय जैन, खारघर शहर मंडल अध्यक्ष प्रवीण पाटील, संध्या शारबिद्रे, सुहासिनी केकाणे, प्रतिभा भोईर, शिल्पा म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, शाळा-महाविद्यालयांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
या वेळी आपल्या भावना व्यक्त करताना लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले की, सार्वजनिक जीवनात वावरताना जमेल तितके काम मी करीत असतो. आज माझ्या प्रेमाखातर आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचे आभार. मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावाने मला जीवनगौरव पुरस्कार मिळत असल्याने अतिशय आनंद आहे.
खासदार श्रीरंग बारणे यांनी आपल्या मनोगतात लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी स्वकर्तृत्वावर इतकी मोठी भरारी घेतली असून शिक्षण संस्था उभ्या करून अनेकांना आयुष्यात मोठे करण्याचे काम ते करीत असल्याचे नमूद केले. आज माझ्या हस्ते त्यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येत असल्याने मी स्वत:ला भाग्यवान समजतो, असेही त्यांनी सांगितले.

Check Also

सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत बैठक

प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करा -आमदार प्रशांत ठाकूर मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको प्रकल्पग्रस्तांनी …

Leave a Reply