Breaking News

म्हसळ्यामध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत, कुंभारवाड्यातील मुलांना घेतला चावा

म्हसळा : प्रतिनिधी

म्हसळा नगरपंचायत हद्दीत मोकाट गुरे व भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून, शुक्रवारी (दि. 3) कुंभारवाडा परिसरांतील योगेश देऊळकर यांच्या घरी आलेल्या अर्जुन, आरोही यांच्यासह छोट्या 2-3 मुलांना कुत्रा चावल्याची घटना घडली. त्यांच्यावर येथील ग्रामिण रुग्णालयात उपचार करण्यात आले. भटक्या कुत्र्यांच्या दहशतीबरोबरच म्हसळा शहरांत मोकाट गुरांचे प्रमाण वाढले आहे.

मोकाट गुरे व भटक्या कुत्र्यांनी म्हसळ्यामधील नागरिक हैराण झाले आहेत. मोकाट गुरांवर मालकांचे व नगरपंचायतीचे कोणतेही  नियंत्रण नसल्याने या गुरांचा शहरातील सर्वांनाच त्रास होत आहे. तसेच या मोकाट गुरांमुळे अनेकदा शहरात वाहतुक कोंडी होते.

भटक्या कुत्र्यांनी म्हसळा शहरात दहशत निर्माण केली आहे. विशेषत: रात्री किंवा पहाटेच्यावेळी मंदिरात किंवा मशीदीत जाणारे  भाविक व पादचार्‍यांना अंगावर हे कुत्रे धावून जातात. अनेकदा त्यांचा चावाही घेतात.

  • महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायती अधिनियम 1965चे 285 प्रमाणे मोकाट गुरे खाजगी किंवा सार्वजनिक मालमतेच्या जागी अतिक्रमण, नासाडी करीत असल्यास त्यांना कोंडवाड्यांत घालणे ही जबाबदारी नगरपालिका अधिकारी किंवा मुख्याधिकार्‍यांची असते. अशाच प्रकारे नगरपंचायती अधिनियम 1965चे 293प्रमाणे भटक्या कुत्र्यांबाबत मुख्याधिकार्‍यांना आधिकार असताना, म्हसळा नगरपंचायत किवा मुख्याधिकारी त्याचे पालन का करीत नाही, असा नागरिकांचा सवाल आहे.

-अनेक वेळा मोकाट गुरांमुळे शहरांत वाहतूक कोंडी होते.   ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांना रस्त्यावर बसलेल्या गुरांना हाकलावे लागते. वास्तविक ही जबाबदारी नगरपंचायत आणि मुख्याधिकार्‍यांची आहे.

-कांती भाऊ, सामाजिक कार्यकर्ते,

म्हसळा.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते आधारकार्ड आणि आरोग्य विमा शिबिराचे उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्त नवीन पनवेलमध्ये आधारकार्ड शिबिर आणि आदित्य बिर्ला आरोग्य विमा शिबिराचे 15 …

Leave a Reply