Breaking News

विभागीय टेबल टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धा उत्साहात

पनवेल : रामप्रह वृत्त

मिस्तु केम प्लास्ट लि., खोपोली व्यवस्थापकीय संचालक संजय मावजी डेढिया, नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशन व सामाजिक विकास मंडळ यांच्या सहकार्याने नवीन पनवेल येथे 26 व 27 मार्च या कालावधीत विभागीय टेबल टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धा टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष संजय कडू यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात पार पडल्या.

या स्पर्धेचे उद्घाटन सिडको एईई संतोष साळी यांच्या हस्ते करण्यात आले, तर मिस्तु केम प्लास्ट लि. चे व्यवस्थापकीय संचालक संजय मावजी डेढिया यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. स्पर्धेचे मुख्य पंच डी. आर. साळसकर, सहाय्यक मुख्य पंच पराग अंकोलेकर उपस्थित होते.

स्पर्धेत मुलींमध्ये स्वरा खराडे सुवर्णपदक, समिक्षा वाघ रौप्यपदक, कांस्यपदक दिया बाउवा आणि तनिष्का चौधरी तर मुलांमध्ये अद्वित गुप्ता सुवर्णपदक, संस्कार पाटील रौप्यपदक, मयंक जैन, दीप मालपे, सुष्मित भिडे, प्रियांश जैन, आदित्य जोग यांनी कांस्यपदक पटकावले.

11 वर्षांखालील मुलींच्या गटात प्रथम अनन्या मराठे तर द्वितीय तन्वी कदम, मुलांमध्ये प्रथम प्रणिल आजगावकर व द्वितीय अद्वित गुप्ता यांनी पटकावला.13 वर्षांखालील मुलींच्या गटात  निहाली पाटील प्रथम, वेदिका भगत द्वितीय, मुलांमध्ये म्रीथय कळामकर प्रथम व हर्षद कुदाळे द्वितीय, 15 वर्षांखालील मुलींमध्ये अंनिशा पात्रा प्रथम, निहाली पाटील द्वितीय, मुलांमध्ये म्रीथय कळामकर प्रथम व शिवम गुप्ता याने द्वितीय, 17 वर्षांखालील मुलींमध्ये अंनिशा पात्रा प्रथम, कनिष्क प्रभू द्वितीय, मुलांमध्ये म्रीथय कळामकर प्रथम, रुषी चव्हाण द्वितीय, 19 वर्षांखालील मुलींमध्ये सुहानी कुराडे प्रथम, कनिष्क प्रभू द्वितीय, मुलांमध्ये अभिजित जोशी प्रथम, तनिष्क गोरे द्वितीय, वयोवृद्ध पुरुषांमध्ये अतुल देशमुख प्रथम, अभिनवकुमार मिश्रा द्वितीय, महिला खुला प्रवर्गात आनंदिता बसाक प्रथम, सुहानी कुराडे द्वितीय, मिश्र दुहेरी खुल्या प्रवर्गात पृथवेश मांडले आणि रुषभ साळसकर प्रथम, आनंदिता बसाक आणि सुहानी कुराडे द्वितीय, पुरुष खुल्या प्रवर्गात राजू यादव प्रथम तर रजत तोरस्कर यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply