Breaking News

माणगाव तालुका भाजप महिला मोर्चा अध्यक्षपदी शर्मिला सत्वे

माणगाव : प्रतिनिधी – भारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांच्या आदेशाने भाजपचे माणगाव तालुकाध्यक्ष संजयआप्पा ढवळे यांनी महिला कार्यकर्त्या शर्मिला सत्वे यांची भाजप महिला मोर्चा माणगाव तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करून त्यांचे अभिनंदन केले. हा नियुक्ती कार्यक्रम शुक्रवारी (दि.10) मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पक्ष कार्यालयात सुरक्षित अंतर ठेवून झाला.

शर्मिला सत्वे या भाजप पक्षाच्या माणगावमधील निष्ठावंत कार्यकर्त्या असून त्यांनी महिलांना संघटीत करून विविध सामाजिक कार्यक्रम यशस्वीपणे राबवून भाजप पक्षाला माणगावसह तालुक्यात ताकद देण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. त्यांच्या सारख्या क्रियाशील महिला कार्यकर्त्या भाजप संघटन मजबूत करून विविध उपक्रम राबविण्यात आघाडीवर असल्याने त्यांची जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.महेश मोहिते यांच्या आदेशाने माणगाव तालुक्यात संजयआप्पा ढवळे यांनी महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षपदी नियुक्ती केली.

शर्मिला सत्वे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे पक्षाच ज्येष्ठ नेते नाना महाले, सुरेंद्र साळी, जिल्हा भाजप कार्यकर्त्या प्राजक्ता शुक्ला, जिल्हा युवा मोर्चाचे चिन्मय मोने,  तालुका भाजप सरचिटणीस योगेश सुळे, राजू मुंढे, हेमा मानकर, तालुका भाजप महिला मोर्चा सरचिटणीस दिपाली जाधव,

तालुका युवा अध्यक्ष विशाल गलांडे, बाबुराव चव्हाण, संतोष कदम, संजय जाधव, साळी तात्या, मधु बक्कम, युवराज मुंढे, राजेंद्र मुंढे आदींसह पक्षाच्या अनेक कार्यकर्ते, महिला मोर्चा कार्यकर्त्या यांनी अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Check Also

नितीन पाटील यांच्या रूपाने पनवेलला मिळणार पहिला आगरी समाजाचा महापौर

उपमहापौरपदासाठी प्रमिला पाटील यांचा अर्ज दाखल पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाकरिता होणार्‍या …

Leave a Reply