Breaking News

पनवेल आगारातील निलंबित फक्त दोन कर्मचारी हजर

एसटी संपकर्‍यांचा लढा सुरूच

पनवेल : प्रतिनिधी

विलीनीकरणासाठी सुरू असलेला एसटी कर्माचार्‍यांचा लढा सुरूच असल्याने परिवहन मंत्री अनिल परब यांनी इशारा देऊन ही निलंबित करण्यात आलेल्या पनवेल आगारातील 42 पैकी फक्त 2 कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. त्यामुळे पनवेल आगारातून फक्त 7 शेड्यूल सुरू आहेत. संपकरी कर्मचारी आता 5 एप्रिलला  न्यायालय आपल्याला न्याय मिळेल या विश्वासावर बसला आहे.

एसटी कर्मचार्‍यांचे विलिनीकरण करावे या मागणीसाठी राज्यात आंदोलन सुरू आहे. या संपामुळे पनवेल आगाराचे कामकाज ठप्प झाले आहे. या आंदोलनाचा फटका प्रवाशांना बसला आहे. पनवेल शहर हे दळणवळणाच्या दृष्टीने मध्यवर्ती ठिकाण आहे. मुंबई, ठाणे, कल्याण, घाटमाथा व कोकणात पनवेल बस आगारातून गाड्या सुटत असल्याने प्रवाशांची मोठी वर्दळ याठिकाणी असते. आगारातील वाहक, चालक आणि कार्यशाळेतील कर्मचार्‍यांनी मागण्या जोपर्यंत मंजूर केल्या जात नाहीत, तोपर्यंत हा संप सुरु राहणार असल्याची भूमिका घेतल्याने आगारातील 305 कर्मचार्यापैकी 42 कर्मचार्‍यांवर कारवाई करण्यात आली.  यामध्ये  चालक वाहक, कार्यशाळा कर्मचारी, वाहतूक नियमत्रक व  चालक-वाहक (चावा) यांचा समावेश आहे

परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचार्‍यांचे शासनात विलिनीकरण करण्याऐवजी त्यांना वेतन वाढ देण्याची तयारी दाखवून  31 मार्चपर्यंत  कर्मचार्‍यांना हजर  होण्याचे आवाहन केले होते. हजर झाल्यास केलेली कारवाई रद्द करण्याचे ही आश्वासन दिले होते. त्याला प्रतिसाद देऊन पनवेल आगारातील 42 पैकी फक्त दोन कर्मचारी हजर झाले आहेत. सध्या पनवेल आगारात 14 चालक आणि 13 वाहक हजर झाल्याने त्यांच्याकडून 40 शेड्यूल पैकी 7 शेड्यूल चालवण्यात येत आहेत. पनवेल, पेण, दोन महाड आणि एक लांब पल्ल्याची अहमदनगर गाडी 31 मार्च पासून सोडण्यात आल्याची माहिती आगार व्यवस्थापक विलास गावडे यांनी दिली.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply