Breaking News

पनवेलकरांनी अनुभवले स्वातंत्र्यवीर सावरकरांचे आगळेवेगळे स्वरूप

कृतज्ञ मी कृतार्थ मी नाट्यप्रयोग सादर

पनवेल : रामप्रहर वृत्त
संस्कार भारती कोकण प्रांत आणि भाजप सांस्कृतिक सेल उत्तर रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मधुबिंब प्रोडक्शन प्रस्तुत कृतज्ञ मी कृतार्थ मी या दोन अंकी नाटकाचा प्रयोग रविवारी (दि. 10) पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात रंगला. ज्येष्ठ कलाकार-दिग्दर्शक यतीन ठाकूर व अभिनेत्री दीप्ती भागवत यांच्या दर्जेदार अभिनयातून राजकारणाच्या पलीकडले स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर उलगडताना पनवेलच्या नाट्यप्रेमी व सावरकरप्रेमींनी पाहिले. सावरकरांचा एकूणच अराजकीय प्रवास या संपूर्ण नाट्याविष्कारातून पनवेलकर रसिकांनी अनुभवला.
फडके नाट्यगृहात झालेल्या या प्रयोगाच्या आधी दीपप्रज्ज्वलन झाले व गौरव गीत सादर करण्यात आले तसेच उपस्थित मान्यवरांच्या स्वागताने सुरुवात करण्यात आली.
संस्कार भारती व भाजप सांस्कृतिक सेल या दोन्ही संस्था सांस्कृतिक व कला क्षेत्रातील विविध कार्यक्रम घेऊन समाजामध्ये सांस्कृतिक जडणघडणीचे काम सातत्याने करीत असतात.
त्याचाच एक भाग म्हणून स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त हा नाट्यप्रयोग रंगला होता.
या वेळी संस्कार भारतीच्या कोकण प्रांतच्या सुनिता खरे, अमित चव्हाण, सौ. टिळक तसेच भाजप सांस्कृतिक सेल उत्तर रायगडचे अध्यक्ष अभिषेक पटवर्धन, सहसंयोजक गणेश जगताप, शहर संयोजक संजीव कुलकर्णी, सदस्य अमोल खेर, वैभव बुवा, साई निकाळजे आदी उपस्थित होते.

Check Also

Have you been on the e, utilizing the thrill off a genuine gambling enterprise sense?

Finest Crazy Go out Gambling establishment Web sites elizabeth Online Uk Do you really discover …

Leave a Reply