Breaking News

अलिबाग एसटी आगारातील 200 कर्मचारी कामावर हजर

अलिबाग : प्रतिनिधी

अंगारकी चतुर्थीचा योग साधत अलिबाग एसटी  आगारातील सुमारे 200 कर्मचारी मंगळवारी (दि. 19) कामावर हजर झाले. सेवासमाप्ती झालेल्या 14 जणांनीदेखील पुन्हा सेवेत घेण्यासाठी अर्ज दिले आहेत.

मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता ठरल्याप्रमाणे एसटी कर्मचारी अलिबाग स्थानकात एकत्र जमले. जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर सारेजण आगारातील गणपती मंदिरात पोहोचले. तेथे अंगारकीनिमित्त अभिषेक पूजाअर्चा झाली. महाआरतीनंतर सर्वजण कामावर हजर होण्यासाठी गेले.

कामकाजानुसार 100 कर्मचार्‍यांना आगारप्रमुख अजय वनारसे यांनी हजर करून घेतले. ज्या 90 कर्मचार्‍यांना बडतर्फ करण्यात आले आहे, त्यांनी अपीलाचे अर्ज सादर केले, ते विभाग नियंत्रकांकडे पाठवण्यात आले. सेवासमाप्ती झालेल्या 14 जणांनीदेखील पुन्हा सेवेत घेण्यासाठी अर्ज दिले आहेत. त्यांनाही लवकरच सेवेत समाविष्ट करून घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल.

न्यायालयाच्या आदेशानुसार आम्ही आज कामावर हजर होत आहोत. आम्ही या काय जिंकलो काय हरलो यापेक्षा या काळात सन्मानाने जगायला शिकलो, ही आमच्यासाठी मोठी बाब आहे.

-प्रसन्ना पाटील, कर्मचारी, एसटी आगार अलिबाग

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply