पनवेल ः रामप्रहर वृत्त
स्व. मितेश रवींद्र जोशी यांच्या स्मरणार्थ व रविशेठ जोशी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मोफत महाआरोग्य शिबिर व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. 24) झाले, तर या शिबिराला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि तालुकाध्यक्ष अरूणशेठ भगत यांनी भेट देत हा उपक्रम राबवल्याबद्दल आयोजकांचे आभार मानले. स्व. मितेश रवींद्र जोशी यांच्या स्मरणार्थ रविशेठ जोशी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने व वाशी एमजीएम हॉस्पिटलच्या सहकार्याने कामोठे सेक्टर 35 येथील श्री गणेश मंदिरात महाआरोग्य शिबिर पार पडले. या शिबिरात जनरल तपासणी, दंत तपासणी, डोळे तपासणी व मोफत चष्मे वाटप, हाडांच्या आजाराची तपासणी, स्त्रीरोग तपासणी, रक्तदाब तपासणी, मधुमेह तपासणी, ईसीजी तपासणी तसेच रक्तदान शिबिरही पार पडले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या वेळी पनवेल महापालिकेचे नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, दिलीप पाटील, विकास घरत, विजय चिपळेकर, डॉ. अरूणकुमार भगत, नगरसेविका कुसुम म्हात्रे, अरुणा भगत, कामोठे शहर अध्यक्ष रवींद्र जोशी, ओबीसी सेलचे जिल्हा अध्यक्ष राजेश गायकर, भाजप नेते भाऊ भगत, के. के म्हात्रे, रवी गोवारी, प्रभाग अध्यक्ष चंद्रकांत कडू, दशरथ जगताप यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper