Breaking News

नागोठणेत पाच दिवसीय वर्षीतप पारणोत्सवास प्रारंभ

नागोठणे : प्रतिनिधी

येथील जैन बंधुभगिनींनी केलेल्या साडेचौदा महिन्यांच्या उपवासाची सांगता मंगळवारी (दि. 7) अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर होत आहे. या धार्मिक सोहळ्याचा प्रारंभ शुक्रवार (दि. 3) पासून झाला असून 6 मे रोजी चौदा महिन्यांचा उपवास केलेल्या तपस्वींची शोभा यात्रा काढण्यात येणार असून, मंगळवारी (दि. 7) सामूहिक वर्षीतप पारणोत्सवाच्या कार्यक्रमानंतर पाच दिवसांच्या धार्मिक कार्यक्रमाची सांगता होणार आहे.

नागोठणे येथील लीलाबाई केवलशा मुथा, चंपादेवी दोशी, संगीता दोशी, सारिका दोशी, ललिता दोशी, जितेंद्र दोशी, ममता दोशी, संगीता दोशी, विमलाबाई मंडलेशा, फेन्सीबाई पिताणी, उर्मिला पिताणी, विक्रम पिताणी, रेखा पिताणी, मनोज पिताणी, सुजाता पिताणी, भरत पिताणी, संतोषी पिताणी, जितेंद्र केवलशा मुथा, शीतल केवलशा मुथा, लीना केवलशा मुथा, सोनल केवलशा मुथा, सोनल केवलशा मुथा, गुणवंती केवलशा मुथा, संगीता केवलशा मुथा, भागचंद केवलशा मुथा, भावना केवलशा मुथा, पुष्पाबाई फुलफगर, सोनल फुलफगर, शांतीबाई फुलफगर, रेखा ओसवाल, कमलाबाई राठोड, वीणा पालरेशा, सरोज परमार, रीना परमार, विजया परमार, ललिता परमार, संगीता परमार, जयश्री पोरवाल, चंपाबाई शर्मा, ताराबाई कोठारी, मंगला सोलंकी, गीता परमार, जीवन परमार, किशोर नाहर आणि सुरेश घोका आदीं जैन बंधुभगिनींनी साडेचौदा महिन्यांचा उपवास केला आहे. या तपस्वींची सोमवारी शहरात शोभा यात्रा काढण्यात येणार असून, मंगळवारी सामूहिक वर्षीतप पारणोत्सवाच्या कार्यक्रमानंतर पाच दिवसांच्या धार्मिक कार्यक्रमाची सांगता होणार आहे.

आचार्य अजित शेखरसुरीश्वरजी महाराज, देवकिर्ती विजयजी महाराज, कृपाशेखर विजयजी महाराज, अभय शेखरसुरीश्वरजी महाराज, चारित्रवर्धनाश्रीजी म. सा., ज्योतीवर्धनाश्रीजी म. सा. आदी साधू- साध्वीची यांची या कार्यक्रमादरम्यान प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमांतर्गत विविध धार्मिक विधी करण्याचा मान शहरातील दहा कुटुंबियांना मिळाला असून, त्यापैकी सकाळी स्वामीवात्सल्य आणि अक्षयतृतीयेला तपस्वींचे पाय धुण्याचा कार्यक्रम माजी सरपंच प्रकाश जैन, निहालचंद जैन यांच्यासह त्यांचे बंधू आणि  कुटुंबियांना मिळाला आहे.

Check Also

‌‘एसआयआर‌’संदर्भात सर्वपक्षीय शिष्टमंडळाची प्रशासनाशी चर्चा

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय निवडणूक आयोगाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) अभियानाच्या …

Leave a Reply