Breaking News

माणगांवात विदेशी दारुसाठा जप्त

माणगांव : प्रतिनिधी

ड्रममध्ये विदेशी दारुचे बॉक्स लपवून ते अवैधरित्या विक्री करीता घेवून जात असलेल्या टेम्पोचा पाठलाग करुन स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने विदेशी दारुसह सुमारे 7 लाख 12हजार 712 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोघाजणांवर माणगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील घटना शनिवारी (दि. 4) सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास घडली.

सागर देवजी तांदळेकर (वय 30, रा. हशिवरे, ता. अलिबाग) आणि शुभम स्वामीनाथ पाटील (वय 22, रा. रांजणखार, ता. अलिबाग) यांनी संगनमत करुन त्यांच्या ताब्यातील टेम्पो (एमएच- 04,एफडी-9402)मध्ये गोवा राज्यातील इंस्टीम इंडस्ट्रिज प्रा. लिमिटेड या कंपनीमधून चलनाप्रमाणे केमिकलचे ड्रम भरुन त्यामध्ये गोवा बनावटीच्या विदेशी दारुचे बॉक्स लपवून ठवले होते. ते अवैधरित्या विक्रीसाठी आणताना स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने पाठलाग करुन माणगावमधील प्रभु ट्रेडर्स या दुकानासमोर टेम्पो पकडला. या प्रकरणी सागर तांदळेकर आणि शुभम पाटील यांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून  2लाख 12हजार रुपये किमतीची विदेशी दारु आणि पाच लाख रुपये किमतीचा टाटा कंपनीचा टेंम्पो जप्त केला आहे.या प्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply