Breaking News

इंग्लंडचे पाच खेळाडू भारतासाठी ठरू शकतात धोकादायक!

चेन्नई : वृत्तसंस्था

ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मायभूमीमध्ये 2-1ने कसोटी मालिकेत हरविणार्‍या टीम इंडियापुढे आता इंग्लंडचे आव्हान आहे. इंग्लंडचे पाच खेळाडू भारतासाठी धोकादायक ठरू शकतात. भारत आणि इंग्लंड यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेला 5 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. 2020मध्ये कोरोनामुळे फार क्रिकेट खेळले गेले नाही, पण इंग्लंडच्या फलंदाज आणि गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

बेन स्टोक्स : भारतासाठी सगळ्यात मोठा धोका बेन स्टोक्सचा आहे. जगातील नंबर 1 अष्टपैलू खेळाडू असलेला  स्टोक्स मॅच विनर आहे. फलंदाजी, गोलंदाजीबरोबरच क्षेत्ररक्षणातही तो माहीर आहे. 2020 साली त्याने सात सामन्यांत 58.27च्या सरासरीने 641 धावा केल्या. यामध्ये दोन शतके आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे, तर गोलंदाजीत त्याने सात सामन्यांमध्ये 19 गडी बाद केले आहेत.

डॉम सिबले : डावखुरा बॅट्समन डॉम सिबले हादेखील टीम इंडियाला त्रास देऊ शकतो. सिबलेचे तंत्र ऑस्ट्रेलियाच्ूया स्टीव्ह स्मिथसारखे आहे. त्यामुळे तो ऑफ साईडऐवजी ऑन साईडला जास्त खेळतो. सिबलेने 2020 साली नऊ सामन्यांत 47.30च्या सरासरीने 615 धावा केल्या आहेत. याशिवाय इंग्लंडचा कर्णधार जो रूटही जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. श्रीलंका दौर्‍यामध्ये त्याने द्विशतक आणि एक शतकही ठोकले होते.

स्टुअर्ट ब्रॉड : स्टुअर्ट ब्रॉड याने 2020 साली आठ सामन्यांमध्ये 38 बळी टिपले. श्रीलंका दौर्‍यातही त्याने चांगली गोलंदाजी केली. त्यामुळे भारतीय फलंदाजांना ब्रॉडसमोर जपून खेळावे लागेल.

जेम्स अंडरसन : टीम इंडियासाठी चौथा धोका आहे जेम्स अंडरसनचा. अंडरसनला भारतीय खेळपट्टीवर इंग्लंडसारखा स्विंग मिळणार नाही, पण अनुभव त्याच्या कामाला येऊ शकतो. अंडरसनने 157 कसोटी सामन्यांमध्ये 606 विकेट घेतल्या आहेत. श्रीलंकेविरुद्ध दुसर्‍या कसोटीत अंडरसनने पहिल्या डावामध्ये 40 धावा देऊन सहा बळी टिपले. त्याने मागच्या सहा कसोटींमध्ये 23 विकेट घेतल्या आहेत.

डॉम बेस : इंग्लंडचा ऑफ स्पिनर डॉम बेस यानेही 2020 साली चांगली कामगिरी केली. आठ सामन्यांत त्याने 16 विकेट घेतल्या. वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर बेसने चांगली कामगिरी केली. आता फिरकीपटूंना मदत करणार्‍या भारतातल्या खेळपट्टीवर बेस कसे प्रदर्शन करतो याकडे लक्ष आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply