Breaking News

पेणमध्ये चोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या चोरट्यास अटक

पेण : प्रतिनिधी

शहरातील आर. के. वाईन शॉप या दुकानात  गुरुवारी (दि. 28) पहाटेच्या सुमारास चोरी करण्याचा प्रयत्नात असलेल्या सूरज सरबजित सिंग (रा. कुंभारआळी, पेण) या चोरट्यास पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याचा साथिदार सुंदर मोरे हा फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

गुरुवार पहाटेच्या सुमारास दोन चोरटे शहरातील आर. के. वाईन शॉपमध्ये चोरी करण्याच्या तयारीत होते. ते समोरील दुकानात काम करीत असलेल्या कारागिराच्या लक्षात आले त्याने त्याची माहिती पेण पोलिसांना दिली. पोलिसांनी आर. के. वाईन शॉपमध्ये चोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या सूरज सरबजित सिंग याला ताब्यात घेतले असून यातील दुसरा आरोपी सुंदर मोरे हा फरार झाला आहे.

या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार संतोष जाधव करीत आहोत. आरोपी सूरज सरबजित सिंग याला 30 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Check Also

गव्हाण ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा

उलवे नोड : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित ग्रामसभा शुक्रवारी (दि.१) माजी …

Leave a Reply