Breaking News

मोर्‍यांच्या कामामुळे मुरूडमधील रस्त्याची कामे थंडावली

मुरूड : प्रतिनिधी

नगरविकास खात्याकडून निधी प्राप्त झाल्यानंतर मुरूडमधील रस्त्यांच्या कामांना वेग आला होता, मात्र शहरातील नवाबकालीन गटारे व मोर्‍यांची कामे सुरू झाल्याने सध्या रस्त्याची कामे थंडावली आहेत.

मुरूड शहरातील रस्त्यांच्या कामासाठी नगर परिषदेला नगरविकास खात्याकडून पाच कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. नगर परिषदेचे मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी तातडीने तांत्रिक मान्यता व टेंडर प्रक्रिया पूर्ण केल्यामुळे रस्त्यांच्या कामांना वेग आला होता. मात्र तत्पुर्वी शहरातील नवाबकालीन गटारे व मोर्‍यांची कामे करणे आवश्यक होते. तसे न झाल्याने सध्या मुरूडमधील रस्त्याची सध्या कामे थांबली आहेत.

मुरुड शहरातील सार्वजनिक वाचनालय, शिवानी मेडिकल व अन्य ठिकाणी मोर्‍यांची कामे सुरू आहेत. मोर्‍याची कामे पूर्ण होताच पुन्हा रस्त्यांच्या कामाला वेग प्राप्त होणार आहे. एक मोरी काम पूर्ण करावयास किमान 20 दिवसापेक्षा जास्त कालावधी लागत असल्याने पावसाअगोदर रस्त्याची कामे पूर्ण व्हावीत अशी अपेक्षा शहरातील नागरिक व्यक्त करीत आहेत.

Check Also

आमदार महेश बालदींच्या उपस्थितीत विविध पक्षांतील कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी यांचे सक्षम नेतृत्व मान्य करून व विकासात्मक धोरणावर …

Leave a Reply