Breaking News

अल्पवयीन मुलगी गर्भवती; शेजारचा मुलगा अटकेत

पनवेल : वार्ताहर

खारघर  परिसरात अतिशय धक्कादायक प्रकार घडला आहे. 16 वर्षांच्या मुलीच्या पोटात दुखत असल्यामुळे पालकांनी डॉक्टरकडे नेले असता डॉक्टरने मुलगी गर्भवती असल्याचे सांगताच पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली. ही 16 वर्षीय मुलगी सात आठवड्यांची गरोदर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पालकांनी मुलीकडे विचारणा केली असता, शेजारी राहणार्‍या मुलासोबत लैंगिक संबंध असल्याची माहिती मिळताच खारघर पोलीस ठाणे गाठून घडलेल्या प्रकारची माहिती दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून हिमांशू दिलीप कुडेकर (वय 20) यास अटक केली आहे.

खारघरमध्ये मुलीचे पालक आणि आरोपी मुलगा शेजारी राहत असल्यामुळे दोघांची ओळख झाली. ओळखीतून मैत्रीत रूपांतर झाले. मिळालेल्या माहितीनुसार नेहमी कुटुंबासारखे राहत असल्यामुळे कोणालाही शंका आली नाही. मुलीचे पालक कामावर गेल्यावर हे दोघेही बाहेर फिरायला जात असत. दरम्यान, मुलाचे मुलीसोबत लैंगिक संबंध निर्माण झाले. दरम्यान, मुलीच्या पोटात दुखत असल्यामुळे पालकांनी दवाखान्यात गेल्यावर हे प्रकरण उघडकीस आले. मुलगी अल्पवयीन असल्याचे समोर आल्यावर अखेर गुन्हा नोंदविण्याचा निर्णय घेण्यात आला.

पीडिता गर्भवती असल्याने बलात्कार व पोक्सो कायद्यानुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात विचारणा केली असता, मुलीची आरोग्य तपासणी करण्यात आली असून आरोपीस अटक करून पुढील तपास सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.

Check Also

पनवेल-उरणच्या पाणी प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक

आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांचा पाठपुरावा मुंबई : रामप्रहर वृत्तसिडकोमार्फत पनवेल व …

Leave a Reply