नवी मुंबई : बातमीदार
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सिबीडी-बेलापूर से-5 येथील गुरुद्वारा येथे आमदार निधीतून उभारण्यात आलेल्या सार्वजनिक स्वच्छता गृह व मोफत दवाखान्याचे लोकार्पण बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या हस्ते झाले.
या वेळी माजी स्थायी समिती सभापती डॉ. जयाजी नाथ, नगरसेवक अशोक गुरखे, माजी नगरसेवक व भाजप महामंत्री निलेश म्हात्रे, गोपाळ गायकवाड, सामाजिक कार्यकर्त्या चैताली ठाकूर, गुरुद्वाराचे अध्यक्ष हरमिंदर सिंग, जसबीर सिंग, जसपाल सिंग, त्रिलोक सिंग, बलदेव सिंग, अवतार सिंग, हरपिंदर धील्लो, संतूर सिंग, गुलविंदर मान, बलकारसिंग, कश्मीर सिंग, संजय ओबेरॉय तसेच असंख्य नागरिक महिला वर्ग उपस्थित होते.
या वेळी आमदार मंदा म्हात्रे यांनी सांगितले की, गेल्या 28 वर्षांपासून मी या शीख बांधवांसह जोडलेली आहे. या शीख बांधवांमुळेच मला सेवा करण्याचा आशीर्वाद मिळाला. गुरुद्वारामध्ये विविध कार्यक्रम होत असल्याने अनेक नागरिक येथे सातत्याने येत असतात. याकरिता त्यांना सुसज्ज व सर्व सुविधांयुक्त सार्वजनिक स्वच्छता गृह बांधून देण्यात आलेले आहे. तसेच गुरुद्वारामध्ये मोफत दवाखाना उभारण्यात आलेला असून यामध्ये दररोज विविध आजाराचे सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरांमार्फत रुग्णांची मोफत तपासणी करण्यात येणार आहे. नागरिकांना आरोग्य सेवा देण्याकरिता सदर मोफत दवाखाना खुला व्हावा, याकरिता माजी सभापती डॉ. जयाजी नाथ व नगरसेवक अशोक गुरखे यांचे सहकार्य लाभल्याबद्दल आमदार मंदा म्हात्रे यांनी त्यांचे कौतुक करून आभार मानले.