रोडपाली जंक्शनवर वाहतूक कोंडीने प्रवासी हैराण

पनवेल ः रामप्रहर वृत्त

मुंब्रा-पनवेल महामार्गावरील नावडे या ठिकाणी उड्डाणपूल नुकताच खुला करण्यात आला आहे. यामुळे या परिसरातील वाहतूक कोंडी काही प्रमाणात सुटली आहे, मात्र रोडपाली जंक्शनवर आता वाहतूक कोंडीचा नवा प्रश्न निर्माण झाला आहे. या ठिकाणी वाहनांना बराच वेळ ताटकळत राहावे लागत आहे.

सध्या रोडपाली जंक्शन येथे फूडलँड कंपनीसमोर लोखंड पोलाद बाजारात जाण्यासाठी एक मार्गिका ठेवण्यात आली आहे. याच मार्गिकेचा वापर थेट कळंबोली सिग्नल येथे जलदगतीने पोहचण्यासाठी केला जातो, तसेच फूडलँड उड्डाणपुलावर वाहने कोंडीत अडकल्याचे पाहून विरुद्ध दिशेने पुलावरून प्रवास करून थेट रोडपाली जंक्शनपर्यंत पोहचण्यासाठी बेकायदा प्रवास करीत आहेत. यामुळे येथील वाहतूक कोंडीत भर पडली आहे.

रोडपाली जंक्शन येथे नवी मुंबई पोलीस मुख्यालयाच्या मार्गावरून येणारी वाहनांची संख्या वाढली आहे. जेएनपीएकडे जाणार्‍या सिग्नलची वेळ 80 सेकंदाची आहे. यावेळेत 15 ते 16 अवजड वाहने जाऊ शकतात. नावडे व रोडपाली येथून वाहने आल्यास त्यांना कळंबोली सिग्लनवर अजून काही वेळ थांबावे लागत आहे. रोडपाली सिग्नलवर सर्वाधिक कोंडीचे कारण हे मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाणार्‍या अवजड वाहनांमुळे ही समस्या वाढली आहे. टोलनाका चुकविण्यासाठी ही वाहने शीव- पनवेल महामार्गावरून रोडपाली जंक्शन येथून थेट पुण्याकडे जाणार्‍या द्रुतगती मार्गावर चढण्यासाठी याच मार्गाचा वापर करतात.

मुंब्रा -पनवेल महामार्गावरील तळोजा नोडमधील 102 आरएएफ कँपसमोरील सिग्नल, नावडे फाटा, रोडपाली सिग्नल व कळंबोली सर्कल ही मुख्य वाहतूक कोंडीची ठिकाणे बनली आहेत.

नावडे येथील उड्डाणपूल वाहनांसाठी खुला झाल्याने रोडपाली सिग्नलवरील वाहतुकीचा ताण अजून वाढला आहे, हे खरे असले तरी येथे वाहतूक पोलीस कर्मचारी सदैव तत्पर असतात. रोडपाली जंक्शन येथे दिवसा पाच पोलीस कर्मचार्‍यांची नेमणूक केली आहे. -निशिकांत विश्वकार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कळंबोली वाहतूक विभाग

Check Also

The member group is always indeed there to aid when needed

Partypoker are an extremely valued spouse for people. And greatest of all – the value …

Leave a Reply