पनवेल : वार्ताहर
नो एंट्रीत प्रवेश करणे, सीटबेल्ट, काळ्या काचा व हेल्मेट न वापरणार्यांविरुद्ध पनवेल शहर वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली आहे. पनवेल शहर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय नाळे हे स्वता रस्त्यावर उतरत कारवाईची धडक मोहिमेला सुरुवात केली आहे. त्याचबरोबर अगामी काळात मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती पनवेल शहर वाहतुक शाखेकडून देण्यात आली.
राज्यात हेल्मेट सक्ती मोठ्या प्रमाणात गाजत आहे. मोठमोठ्या शहरात याबाबत अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. त्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात प्रबोधन आणि जनजागृती करण्यात येत आहे. परिसरात आता दुचाकीस्वार हेल्मेट घालूनच प्रवास करीत आहेत. काही अपवाद वगळता हेल्मेट न चुकता घातले जात आहे. याचे महत्वाचे कारण म्हणजे वाहतुक शाखेने बिगर हेल्मेटविरोधात मोठी मोहीम हाती घेतली आहे. वास्तविक पाहता हेल्मेट घालणे हे दुचाकी स्वाराच्या फायद्याचे आहे. यामुळे कित्येकदा अपघातात प्राण वाचतात याचे कारण म्हणजे डोक सुरक्षित राहते त्याला मार लागत नाही. असे असतानाही काही दुचाकीस्वार हेल्मेट घालत नसत त्यांच्याविरोधात दंडात्मक कारवाई पनवेल शहर वाहतूक शाखेने केली आहे.
या वेळी उरण नाका येथून टपाल नाकाकडे नो एंट्रीत प्रवेश करणे, चारचाकी वाहनांना कालाय काचा, सीटबेल्ट, ट्रिपल शिट, अशी धडक मोहीम राबविण्यात आली आहे. या वेळी पनवेल शहर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय नाळे शनिवारी सकाळी दहा वाजल्यापासून पनवेल परिसरात रस्त्यावर उतरून कारवाई करीत असल्याने कोणाचीही गय केली जात नाही. कर्मचार्यांनाही हेल्मेट न वापरणार्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
विना हेल्मेट, सीटबेल्ट, व काळ्या काचा वापरणे अश्या वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. त्याचबरोबर अनेक वाहनाला काळ्या काचा वापरल्या जातात, तसेच सीटबेल्टचादेखील वापर करीत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यानुसार अश्या बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये पाच कर्मचारी व एक अधिकारी यांनी ही कारवाई केली.
आम्ही सीटबेल्ट न वापरणे, काळ्या काचा, नो एंट्रीत प्रवेश करणे, विना हेल्मेट चालणार्या वाहनचालकांवर कारवाईची विशेष मोहीम हाती घेतली आहे. याबाबत जनजागृतीही करण्यात आली. त्याचा परिपाक म्हणजे हेल्मेट वापरणार्यांची संख्या कमालीची वाढली आहे. त्यामध्ये आनखी भर पडेल असा विश्वास आम्हाला वाटतो.
-संजय नाळे, वरिष्ठ पोलीस निरिक्षक, पनवेल शहर वाहतुक शाखा