Breaking News

रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयाचा शंभर टक्के निकाल

खारघर : बारावीच्या परीक्षेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल 100 टक्के लागला आहे.
या विद्यालयातून विज्ञान शाखेमधून आकांशा लालमन गुप्ता (95%) प्रथम, सैमा युनूस शेख (84.17%) द्वितीय व यासिर इम्रान डिवदे (78.67%) तृतीय आला, तर वाणिज्य शाखेतून भावना दिनेश रावारिया (91%) प्रथम, रजनिश संजीव वर्मा (88.50%) द्वितीय व अब्दुल्लाहक शामशुद्दीन (87.50%) तृतीय आला.
या धवल यशाबद्दल संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, सचिव डॉ. एस. टी. गडदे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच प्राचार्य, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारीवर्ग यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply