

पनवेल : पनवेल क्रिकेट स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून 12 ते 19 मेपर्यंत पनवेल प्रीमिअर लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत 6 संघ सहभागी होणार असून, या संघाच्या स्पर्धकांची निवड करण्याकरिता रविवारी सुरूची हॉटेलमध्ये लिलाव पुकारण्यात आला. या वेळी पनवेल क्रिकेट स्पोर्टस् अकॅडमीचे अध्यक्ष रवी नाईक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.