Breaking News

पक्षविरोधी कार्यवाहीबद्दल गणेश वाघिलकर सहा वर्षांसाठी निलंबित

पनवेल : पक्षविरोधी कार्यवाही केल्याबद्दल तक्का येथील गणेश वाघिलकर यांचे भारतीय जनता पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबन करण्यात आले आहे. या संदर्भात भाजपचे शहराध्यक्ष जयंत पगडे यांनी वाघिलकर यांना निलंबन पत्र पाठविले आहे. या पत्रात म्हटले आहे की, आपण आपल्या गावातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याविरोधात अपप्रचार व त्यांची खोटी बदनामी करीत असून, आपणास सातत्याने सूचना देऊनही सुधारणा झाली नाही. आपली वागणूक नेहमीच पक्ष व पदाधिकार्‍यांच्या विरोधात राहिली असून, यामुळे पक्षाची हानी होत आहे. आपणाविरुद्ध पक्षाला या संदर्भात नाईलाजाने कारवाई करणे भाग पडत आहे. म्हणून उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निर्देशानुसार आपणास भारतीय जनता पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात येत आहे.

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply