Breaking News

कर्जत-कल्याण राज्यमार्गालगत मातीचा भराव, तारेचे कुंपण

ममदापूर ग्रामपंचायतीकडून गटार मोकळे करण्याच्या सूचना

कर्जत  : बातमीदार

तालुक्यातील ममदापूर ग्रामपंचायत हद्दीमधून जाणार्‍या कर्जत- कल्याण राज्यमार्गालगत मातीचा भराव व तारेचे कुंपण घालण्यात आले आहे. त्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेले गटार बंद झाले आहे. दरम्यान, मातीचा भराव बाजूला करून गटार खोदून द्यावे, अशा सूचना ममदापूर ग्रामपंचायतीने संबंधित जमीन मालकाला देण्यात आल्या आहेत.

कर्जत-कल्याण रस्ता ममदापूर ग्रामपंचायतीच्या हद्दीतून जातो. या भागातील रस्त्याच्या कडेला असलेल्या सर्व्हे नंबर 174 ही जमीन आहे. त्यातील हिंसा नंबर 4 मध्ये गेल्या महिनाभरासून मातीचे उत्खनन सुरु आहे. तसेच रस्त्याच्या बाजूला मातीचा भराव करून काटेरी कुंपण घालण्यात आले आहे. त्याबाबत स्थानिक रहिवासी अ‍ॅड. गजानन डुकरे यांनी आवाज उठविला आहे.

कर्जत-कल्याण राज्यमार्गाच्या कडेला करण्यात आलेल्या मातीच्या भरावामुळे रस्त्याच्या बाजूचे गटार बंद झाले आहे. त्यामुळे पावसाळ्यात दिव्यादिप हॉटेलपासून येणारे सांडपाणी थेट रस्त्यावरून वाहून जाणार आहे.    या बाबत स्थानिकांनी ममदापूर ग्रामपंचायतीकडे तक्ररी केल्या असून रस्त्याचे जुने गटार पुन्हा खोदून देण्याची मागणी केली आहे.

ग्रामपंचायत हद्दीमध्ये रस्त्याच्या बाजूला असलेले गटार मातीचा भराव टाकताना बुजले आहे.  पावसाळा जवळ आल्याने हे गटार तात्काळ खोदून देण्याचे संबंधीतांना कळविले आहे. त्यांनी गटार खोदून दिले नाही त्यानंतर कारवाई केली जाईल.

-संजय राठोड, ग्रामविकास अधिकारी, ममदापूर, ता. कर्जत

कर्जत-कल्याण रस्त्याच्या बुजविण्यात आलेल्या गटारांची पाहणी करून संबंधितावर कारवाई करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. त्यासाठी स्थळ पाहणी महत्त्वाची असल्याने आधी पाहणी केली जाईल.

-संजीव वानखेडे, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, कर्जत

Check Also

पनवेल महापालिका क्षेत्रातील न्हावाशेवा टप्पा 3 पाणीपुरवठा योजनेची आढावा बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिका क्षेत्रातील शहरी आणि ग्रामीण भागांना पाणीपुरवठा करणार्‍या न्हावाशेवा टप्पा 3 …

Leave a Reply