Breaking News

नेरळमधील रक्तदान शिबिरास उत्स्फू र्त प्रतिसाद; 155 दात्यांचा सहभाग

कर्जत ः बातमीदार – कोरोनावर मात करण्यासाठी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासन अथक  प्रयत्न करीत असून रुग्णांवर उपचार करताना मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज आहे. त्या पार्श्वभूमीवर जनतेला रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद देत नेरळ येथे आयोजित रक्तदान शिबिरात तब्बल 155 रक्तदात्यांनी रक्तदानाचे पवित्र कार्य केले. दरम्यान, नेरळमधील एवढ्या मोठ्या संख्येने रक्तदान करण्याचे हे पहिलेच शिबिर ठरले आहे.

कर्जत अपडेट या सोशल मीडिया ग्रुपच्या माध्यमातून नेरळ येथील श्री समर्थ सेवा संघाच्या बापूराव धारप सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सार्वजनिक रक्तदाते राजाभाऊ कोठारी यांचे हे 397वे रक्तदान शिबिर होते. कल्याण येथील संकल्प रक्तपेढीने रक्त संक्रमणाचे काम केले. रक्तदान शिबिराचे उद्घाटन तालुका सभापती सुजाता मनवे, जिल्हा परिषद सदस्या अनसूया पादिर, नेरळचे सरपंच रावजी शिंगवा, उपसरपंच शंकर घोडविंदे, पंचायत समिती सदस्य नरेश मसणे, नेरळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक अविनाश पाटील यांच्या हस्ते झाले. प्रथम रक्तदान ग्रुप कार्यकर्ते मनोहर हजारे, बंडू क्षीरसागर

यांनी केले.

कर्जत अपडेट ग्रुपचे सक्रिय कार्यकर्ते मिलिंद विरले, संदीप म्हसकर, बंडू क्षीरसागर, मनोहर हजारे, प्रवीण बाबरे, अनिल जैन, निलेश शाह, अमित जैन ,प्रथमेश कर्णिक, अ‍ॅड. अजित मंडलिक, योगेश साठे, शिवाजी कराळे, किशोर गायकवाड, गणेश पवार, दर्वेश पालकर, अ‍ॅड. ऋषिकेश कांबळे, बाळा पादिर, अजय गायकवाड, कांता हाबळे, दीपक बोराडे, निलेश शाह, मंगेश इरमाळी, रवी मसणे, सनी चंचे, महेश मोरे, दिनेश कालेकर, किरण झोमटे, अनंता भोईर, गोरख शेप, कौशिक शाह, नरेंद कराळे, जयेश म्हसे, अमित देवळे आणि सहकार्‍यांनी केलेल्या प्रयत्नामुळे शिबिर यशस्वी झाले.

Check Also

आगामी निवडणुकांसाठी सज्ज राहा -आमदार प्रशांत ठाकूर

खोपोली : प्रतिनिधी भाजपच्या कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकांसाठी सज्ज राहावे. सध्या कोकण पदवीधर मतदारसंघासाठी प्रचार करीत …

Leave a Reply