Breaking News

पनवेल मनपा कर्मचार्‍यांच्या सर्तकतेमुळे कळंबोली स्टील मार्केटमधील दुर्घटना टळली

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल महापालिकेच्या कर्मचार्‍यांच्या सर्तकतेमुळे स्टील मार्केट परिसरात होणारी दुर्घटना टळली आहे. स्टील मार्केटजवळील नाल्यात भंगारवाल्यांनी बोटीचा सांगाडा फेकून दिले असून ही बोट ब्रीजखाली अडकली होती. या दरम्यान जर पाऊस झाला असता तर मोठ्या प्रमाणत शहरामध्ये पाणी साचले असते, मात्र महापालिकेचे कर्मचार्‍यांच्या सतर्कतेमुळे हा अपघात टळला आहे.

कळंबोली स्टील मार्केट जवळील एका नाल्यात भंगार वाल्यांनी बोटीचा सांगाडा फेकून दिले होते. ही बोट नाल्यालागून असलेल्या ब्रीज खाली अडकली होती. रायगड जिल्ह्यात सध्या पावसाचे अगमन कधीही होऊ शकते असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या दरम्यान जर मुसळधार पाऊस झाला असता तर या नाल्यातील पाणी कळंबोली शहरामध्ये मोठ्या प्रमाणात घुसले असते, मात्र महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक अरुण कांबळे यांच्या सतर्कतेमुळे या बोटीचा सांगाडा नाल्या बाहेर काढण्यात आला. अरुण कांबळे यांनी दाखवलेल्या या तत्परतेबद्दल प्रभाग समिती ‘ब’च्या सभापती प्रमिला पाटील आणि भाजपचे कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील यांनी स्वच्छता निरीक्षक अरुण कांबळे यांना धन्यवाद दिले.

Check Also

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …

Leave a Reply